Join us

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:06 IST

मुंबई : साकीनाक्यातील पीडितेवरील अत्याचार व राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनेबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा चंद्रमुखी देवी यांनी ...

मुंबई : साकीनाक्यातील पीडितेवरील अत्याचार व राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनेबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा चंद्रमुखी देवी यांनी रविवारी पोलीस महासंचालक संजय पांडे याची भेट घेऊन चर्चा केली. या घटनांतील आरोपींना कडक शासन होण्याबरोबरच त्याला पूर्णपणे पायबंद बसावा, यासाठी ठोस कारवाई करण्याची सूचना त्यांनी पांडे यांना दिल्या.

साकीनाक्यातील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा चंद्रमुखी देवी मुंबईला आल्या. त्यांनी घटनास्थळ, साकीनाका पोलीस ठाणे आणि पीडितेवर उपचार करण्यात आलेल्या राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर संजय पांडे यांनी भेट घेऊन घडलेल्या घटनेबद्दल करण्यात आलेली कारवाई आणि महिलांच्या सुरक्षेबाबत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती घेतली. अशा घटना टाळण्यासाठी तातडीने योग्य खबरदारी घेण्याच्याही सूचना केल्या.