Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय महिला, बाल विकास बोर्डावर देवधर

By admin | Updated: July 18, 2015 01:49 IST

माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांची केंद्रीय महिला व बालविकास बोर्डाच्या सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ही नेमणूक केली.

मुंबई: माय होम इंडिया संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांची केंद्रीय महिला व बालविकास बोर्डाच्या सल्लागार समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ही नेमणूक केली. विशेष म्हणजे आजच माय होम इंडियाच्या मुंबई विभागातर्फे आज आठ मुलींना डोंगरी येथील बालगृहामधून उत्तर प्रदेशात स्वगृही पाठवण्यात आले. माय होम इंडियाने सुमारे ३५० मुला-मुलींची वर्षभरात पालकांची भेट करुन दिली आहे.