Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच येणार २४ बंबार्डिअर लोकल; रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील

By महेश चेमटे | Updated: November 18, 2017 02:47 IST

मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा कार्यान्वित असलेल्या नवीन २४ बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेत येणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा कार्यान्वित असलेल्या नवीन २४ बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेत येणार आहे. मध्य रेल्वेने नवीन बंबार्डिअर लोकलसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाने मंजुरीचे पत्र पाठविले आहे. संबंधित लोकल बांधणी करणाºया कंपनीला वेगाने काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पर्यंत नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.मध्य रेल्वेवर सद्यस्थितीत सिमेन्स बनावटीच्या लोकल धावत आहेत. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा असलेल्या बंबार्डिअर लोकलसाठी मध्य रेल्वेनेप्रस्ताव पाठविला होता. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे लोकल बांधणीचे काम सुरू आहे. नवीन लोकलपैकी एक लोकल मुंबईच्या दिशेने नुकतीच रवाना झाली आहे.सुविधेसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’-हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा देणारा अ‍ॅक्शन प्लॅन मध्य रेल्वेने तयार केला आहे. या आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रवासी सुविधेत बदल केले जाणार आहेत.‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार सद्यस्थितीत ९ बोगींच्या लोकल१२ बोगींच्या करण्यात आल्या आहेत. लवकरच हार्बर मार्गावरील जुन्या लोकलच्या जागी नव्या लोकल धावणार आहेत.मेधाच्या बदल्यात बंबार्डिअरनवीन २४ लोकलपैकी पहिली मेधा लोकल गेल्या आठवड्यात मुंबईत दाखल झाली. मेधा लोकलच्या बदल्यात नवीन बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकल