Join us  

Mumbai Train Update : कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 9:27 AM

ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (13 मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे.

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (13 मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (13 मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. 

कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने  रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अनेकांना यामुळे लेट मार्क लागण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे काही दिवसांपूर्वी लोकल सेवा ठप्प झाली होती. परळ ते माटुंगा दरम्यान पाच ते सहा लोकल एका मागोमाग एक थांबल्या होत्या. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या असल्याची माहिती मिळाली होती. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात शुक्रवारी (26 एप्रिल) लोकलला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. हार्बर लाईनवरील एक लोकल ट्रेन बफरला धडकली. फलाट क्रमांक एकवर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला. दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. मात्र फलाट क्रमांक एकवरील वाहतून काही काळ खोळंबली होती.

मध्य रेल्वे मार्गावर 79 पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरूदरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाºया लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत 70 ते 80 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमुंबईमध्य रेल्वे