Join us

मध्य रेल्वे : फुकट्या प्रवाशांकडून १३० कोटी रुपयांची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 03:25 IST

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विनातिकीट आणि सामानाची बेकायदा वाहतूक करणा-या, प्रवाशांकडून...

मुंबई : मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विनातिकीट आणि सामानाची बेकायदा वाहतूक करणा-या, प्रवाशांकडून एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत १३० कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.जानेवारी महिन्यात २ लाख १६ हजार प्रवाशांकडून ९ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात यंदा ११.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या महिन्यात ८ कोटी ३५ लाखांचा दंड वसूल केला होता. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या दहा महिन्यांमध्ये २६ लाख ५७ हजार विनातिकीट प्रवाशांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली. त्यांच्याकडून १३० कोटी ४४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी या दहा महिन्यांमध्ये २२ लाख ६३ हजार गुन्ह्यांची नोंद झाली होती. या दंडाच्या रकमेत या वर्षी १७.३८ टक्क्यांनी वाढ झाली.योग्य तिकीट काढून प्रवास करावा, असे उद्घोषणेतून प्रवाशांना सांगण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई लोकल