Join us

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Updated: November 8, 2014 22:48 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणो मार्गावरील अप जलद दिशेसह हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दिशांवर रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणो मार्गावरील अप जलद दिशेसह हार्बरच्या कुर्ला-वाशी अप/डाऊन दिशांवर रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक स. 1क्.3क् ते दु. 3.33 या कालावधीत असेल. त्यामुळे अप जलद मार्गावर ब्लॉकच्या कालावधीत उपनगरीय सेवा उपलब्ध नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 
त्याचा परिणाम डोंबिवली स्थानकातील जलदच्या प्रवाशांवर होईल. त्यांनी फलाट 3 वर जाऊन धीम्या मार्गानेच प्रवास करावा, अशी सूचना प्रवासी संघटनांनी केली आहे. तसेच स्थानक प्रबंधकांनी सातत्याने याबाबतची माहितीही द्यावी, अपेक्षा व्यक्त केली.
हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी मार्गावर अप/डाऊन दोन्ही दिशांवर ब्लॉक असल्याने स. 11 ते दु. 3 या कालावधीत सीएसटी ते बेलापूर/वाशी/पनवेल या ठिकाणी अप/डाऊन दोन्ही दिशांवर गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सीएसटी-कुर्ला, वाशी-पनवेल येथे विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. ट्रान्स-हार्बरच्या ठाणो-पनवेल या दोन्ही मार्गावर अप/डाऊन दिशांवरील लोकल त्यांच्या वेळापत्रकानुसारच धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना स. 1क् ते संध्या. 4 या ब्लॉकच्या कालावधीत आहे त्याच तिकीट/पासावर ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवासाची मुभा असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.
 
प.रेल्वेवर जम्बोब्लॉक
डोंबिवली - पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ-गोरेगाव दोन्ही दिशांवरील धीम्या मार्गावर रविवारी स. 1क्.35 ते दु. 3.35 या कालावधीत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत त्या स्थानकांदरम्यान लोकल दोन्ही दिशांवर जलद मार्गावर वळविण्यात आल्या असून फलाटाअभावी विलेपार्ले स्थानकात लोकल दोन वेळा थांबविण्यात येणार असल्याचे जनसंपर्क विभागाने  स्पष्ट केले आहे.