Join us  

गणेशभक्तांना मध्य रेल्वेची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:14 AM

कोकणातील गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने दादर-सावंतवाडी रोड विशेष गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला

मुंबई : कोकणातील गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने दादर-सावंतवाडी रोड विशेष गाडीला दिवा स्थानकात थांबा दिला आहे. दादर स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे ही विशेष गाडी दिवा स्थानकात २ मिनिटांचा थांबा घेईल.गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. उत्सव काळात प्रवाशांचा सर्वाधिक ताण मध्य रेल्वेवर असतो. परिणामी, हा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर उत्सव काळात २४२ विशेष ट्रेन फेºया चालवण्यात येतील. प्रवाशांच्या मागणीनुसार पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडीदेखील सोडण्यात येईल. त्यात मध्यरेल्वेने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना दिलेल्या विशेष दिवा थांबा भेटीमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.ट्रेन क्रमांक (०१११३) दादर-सावंतवाडी रोड-दादर विशेष ट्रेनला १८ आॅगस्टपासून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरपर्यंत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. दादर येथून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी ट्रेन सुटेल. ही गाडी दिवा स्थानकात सकाळी ८.३३ वाजता पोहोचेल.दिवा स्थानकात २ मिनिटांचा विशेष थांबा घेऊन त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल. ही गाडी (०१११४) प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवारी मुंबईच्या दिशेने सुटणार आहे. सावंतवाडी स्थानकातून पहाटे ४.५० वाजता निघणारी ही ट्रेन दुपारी ३ वाजता दिवा स्थानकात पोहोचणार आहे.>असे असतील विशेष थांबेगाडीची रचना : एक वातानुकूलित चेअर कार, सात द्वितीय श्रेणी चेअर कार आणि चार सामान्य द्वितीय श्रेणीकालावधी : १९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरविशेष थांबा : दिवा (२ मिनिटे)थांबा : ठाणे, दिवा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरावली गाव, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कनकवली, सिंधुदुर्ग

टॅग्स :गणेशोत्सव