Join us

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची विविध सांस्कृतिक उपक्रमांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:09 IST

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे विविध ...

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे विविध सांस्कृतिक उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीची बैठक घेतली. कला, संगीत आणि नृत्य इत्यादींद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जन्मजात सांस्कृतिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली.

---

मध्य रेल्वेची फिट इंडिया फ्रीडम रन

मुंबई : सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स ॲकॅडमी (सीआरएसए) ने फिट इंडिया चळवळीच्या अनुषंगाने आणि ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे शनिवारी ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’ आयोजित करण्यात आली होती. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा मीनू लाहोटी उपस्थित होत्या.

फिट इंडिया चळवळ ही राष्ट्रीय चळवळ म्हणून राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज धावणे / चालणे आवश्यक आहे असा संदेश देण्यासाठी या चळवळीचा उद्देश आहे. संपूर्ण चळवळ १३ ऑगस्टपासून सुरू झाली आणि २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहील. या वेळी सर्व कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यात आले.