Join us

मध्य रेल्वेची उत्पन्नात भरारी

By admin | Updated: October 9, 2014 01:24 IST

मध्य रेल्वेने यंदा उत्पन्नात भरारी घेतली आहे. २0१४-१५ मध्ये २0 सप्टेंबरपर्यंत तब्बल ४ हजार ८५५ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न

मुंबई : मध्य रेल्वेने यंदा उत्पन्नात भरारी घेतली आहे. २0१४-१५ मध्ये २0 सप्टेंबरपर्यंत तब्बल ४ हजार ८५५ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे. मागील वर्षी ४ हजार १२५ कोटी ८ लाख रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले होते. त्याचप्रमाणे मालवाहतुकीतूनही मध्य रेल्वेला दोन हजार २ हजार ३३५ कोटी ३१ लाख रुपये महसूल मिळाला असून, मागील वर्षी २ हजार २५२ कोटी ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. हे उत्पन्न १८.९८ टक्क्यांनी वाढले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)