Join us

लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

By admin | Updated: December 16, 2014 09:44 IST

दिवा-डोंबिवलीदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे

 ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. १६ -  दिवा-डोंबिवलीदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणा-या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.