Join us
Daily Top 2Weekly Top 5

गितांजली एक्स्प्रेसमधील बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

By admin | Updated: July 28, 2016 08:19 IST

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला असून वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 28 - मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. गितांजली एक्स्पेसमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. गितांजली एक्स्पेसमधील बिघाड दुरुस्त करून लोकल कल्याणच्या दिशेने पाठवण्यात आली आहे, मात्र लोकल उशिराने धावत आहेत. सकाळची वेळ असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.