Join us  

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर-विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:12 AM

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई :  ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान अप फास्ट मार्गावर रुळाला तडे गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर मंगळवारी (23 ऑक्टोबर) सकाळीच लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घाटकोपर आणि विद्याविहार स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :मध्य रेल्वेलोकलमुंबईघाटकोपर