Join us  

मध्य रेल्वेच्या रोजच्या विलंबाला प्रवाशी नाराज, व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:35 AM

मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक गेल्या काही दिवसांपासून उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली- मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक गेल्या काही दिवसांपासून उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. कर्जत-कसारा मार्गावरून येणाऱ्या लोकलची वाहतूक विलंबाने सुरू असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. धुकं आजचं नसून दरवर्षी पडतं, पण तरीही यंदा होणारा लेट हा खूप त्रासदायक असल्याची खंत डोंबिवलीतील प्रवाशांनी व्यक्त केली. महिला प्रवासी नाराज असून काहींनी थेट राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. तुम्ही काहीतरी करू शकता असे सांगत त्यांनी व्यथा मांडल्या. लेट मार्कमुळे प्रवासी हैराण आहेत.

उद्घोषणा सूचना पण देत नसल्याने नेमका प्रॉब्लेम काय आहे हेदेखील कळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली. तसेच लेट झाल्याने येणाऱ्या गाड्याना प्रचंड गर्दी झाली आहे, त्यात चढणे मुश्किल झाल्याचे महिलांनी सांगितले. लोकल वाहतूक 44 मिनिटं असतानाही काही ठिकाणी ती 15-20 मिनिटे उशिर असल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवासी जास्त नाराज आहेत.

आगामी महिन्यात 12 वी 10 वीच्या तसेच अन्य शाखांच्या परीक्षा आहेत, जर रेल्वेचा असा घोळ सुरू राहील तर मात्र विद्यार्थ्यांनी काय करायचे, त्यांचे शैक्षणिक लेखाजोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्याचीही भीती पालक प्रवाशांनी व्यक्त केली. 

टॅग्स :मध्य रेल्वेरेल्वे प्रवासी