Join us  

कोरोनाला ठार मारून माणूस जगवणारी केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:48 AM

महापालिकेचे कर्मचारी बनले योद्धा : ७,६५० बेड, १,४६६ वैद्यकीय कर्मचारी आणि ३५ तज्ज्ञ देताहेत लढा; मानसिक संतुलन बिघडू न देण्याचे आवाहन

- सचिन लुंगसेमुंबई : खोकला येतो. श्वास कोंडतो. अस्वस्थ व्हायला होते. अचानक आरोग्य बिघडू लागते. आरोग्याची चाचणी केल्यानंतर कोविड पॉझिटिव्हचा अहवाल येतो आणि मग सुरू होते ती रुग्णाला आरोग्य यंत्रणा पुरविण्यासाठीची पळापळ. कधी रुग्णालय मिळत नाही. कधी रुग्णवाहिका मिळत नाही. कधी कोविड सेंटरमध्ये प्रवेश मिळत नाही. रुग्णावरील उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचा अभाव असतो. प्रशासन कोणालाच जुमानत नाही. हे सगळेच मिळाले तरी आसपासचे वातावरण बघूनच रुग्ण निम्मा होतो. त्यात पुन्हा आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थितीतून कुटुंबालाही यातना होतात. मात्र या सगळ्यांवर मात करता यावी, रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता यावे आणि मुंबापुरीला कोरोनामुक्त करता यावे म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. असंख्य अडथळ्यांना रुग्णांना तोंड द्यावे लागत असले तरीही कोरोना तुमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेणारी मुंबई महापालिका रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी झटत असून, ७,६५० बेड, १,४६६ वैद्यकीय कर्मचारी आणि ३५ तज्ज्ञ यासाठी काम करत आहेत.मुंबई : महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये भायखळा, एन.एस.सी.आय. वरळी, बीकेसी, नेस्को गोरेगाव, मुलुंड आणि दहिसरचा समावेश आहे. येथे सुमारे ७ हजार ६५० बेड उपलब्ध आहेत. १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केईएम, नायर, सायन या प्रमुख रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉयचा समावेश आहे. विशेष म्हणजे ११ खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत ३५ तज्ज्ञ डॉक्टर मंडळी दूरध्वनीद्वारे केंद्रांना सेवा देत आहेत. येथे गरजेनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची तरतूद आहे.या उपचार केंद्र्रांमध्ये आतापर्यंत २० हजार ७२२ रुग्णांवर उपचार झाले. मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, ‘चेस दि व्हायरस’ मोहिमेमुळे कोरोनाला रोखले गेले आहे. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घेतली जात आहे.प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर देऊन रुग्णांची वाढती संख्या रोखत कोरोनावर नियंत्रण मिळवायला हवे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे.कोणत्या कोविड सेंटरमध्ये काय?रिचर्डसन आणि क्रुडास या कंपनीच्या आवारात सेंटर१ हजार बेड१०० वैद्यकीय कर्मचारीजसलोक रुग्णालयातील २ तज्ज्ञभाटिया रुग्णालयातील ३ तज्ज्ञआतापर्यंत १ हजार ५९८ रुग्णांवर उपचारएन.एस.सी.आय.च्या आवारात सेंटर५५१ बेड१८७ वैद्यकीय कर्मचारीबॉम्बे रुग्णालयातील ५ तज्ज्ञब्रिच कँडी रुग्णालयातील ३ तज्ज्ञआतापर्यंत ३ हजार ५६१ रुग्णांवर उपचारबीकेसी येथीलमैदानात सेंटर१,८२४ बेड५२२ वैद्यकीय कर्मचारीलिलावती रुग्णालयातील ३ तज्ज्ञहिंदुजा रुग्णालयातील ४ तज्ज्ञआतापर्यंत ७ हजार ५८८ रुग्णांवर उपचारनेस्को मैदानात सेंटर२,१६० बेड४९८ वैद्यकीय कर्मचारीनानावटी रुग्णालयातील ४ तज्ज्ञकोकीलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयातील २ तज्ज्ञआतापर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांवर उपचाररिचर्डसन आणि क्रुडास या कंपनीच्या आवारात सेंटर१,६५० बेड२०५ वैद्यकीय कर्मचारीफोर्टीस रुग्णालयातीलतज्ज्ञ डॉक्टरआतापर्यंत १ हजार ६५२ रुग्णांवर उपचारवैद्यकीय कर्मचारी,तज्ज्ञ डॉक्टरांची फौज६८५ बेड२२४ वैद्यकीय कर्मचारीबॉम्बे रुग्णालयातील ५ तज्ज्ञ डॉक्टरसुराणा रुग्णालयातील ३ तज्ज्ञ डॉक्टरआतापर्यंत १ हजार ४०६ उपचार

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस