Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मराठी भाषा गौरवदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:08 IST

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मराठी भाषा गौरवदिन हे दोन्ही कार्यक्रम उत्साहात ...

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मराठी भाषा गौरवदिन हे दोन्ही कार्यक्रम उत्साहात व स्पर्धकांच्या उत्तम प्रतिसादात साजरे झाले. कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व सरकारी निर्बंधांमुळे कार्यक्रम व स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिलेल्या या सोहळ्यास अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पवार, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, रांगोळीकार सिद्धेश बागवे आणि गजल नवाज पं. भीमराव पांचाळे यांचे परिक्षण व मार्गदर्शन लाभले.

पोर्ट ट्रस्टच्या बॅलार्ड पिअर येथील कॉन्फरन्स हॉल या दोन्ही कार्यक्रमांचा सांगता सोहळा झाला. त्यास अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या श्रम विभागाचे वरिष्ठ उपव्यस्थापक मिलिंद कुलकर्णी, उपव्यवस्थापक रुफी कुरेशी, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर उपस्थित होते.