Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा करणे पोलिसाला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

मुंबई : अभिलेखावरील गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या शिवडी पोलीस ठाण्यातील हेमंत कापसे या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहेत. ...

मुंबई : अभिलेखावरील गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या शिवडी पोलीस ठाण्यातील हेमंत कापसे या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहेत. खातेनिहाय करण्यात आलेल्या चौकशीत तो दोषी आढ़ळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने ३ जुलै रोज़ी ही कारवाई केल्याचे समजते.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, कापसे हा अभिलेखावरील आरोपी असलेल्या त्रिकुटासोबत राहत होता. त्याच्या वाढदिवशी या तिघांना बोलावले तसेच रक्तदान शिबिरादरम्यानही सोबत फ़ोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. सर्व्हिस रिव्हॉल्वर हातात घेऊन खासगी कारमध्ये काढलेला फ़ोटोही कापसेने व्हॉट्सॲपवर ठेवला होता.

कापसेच्या वागणुकीमुळे पोलिसांबाबत चुकीची ओळख जात होती. यामुळे पोलिसांची बदनामी होत होती. तसेच खातेनिहाय चौकशीत तो दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.