Join us  

दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करू या - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:19 AM

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या दिवशी महाराष्ट्रातील शाळा - महाविद्यालयांतही ‘योग दिन’ साजरा केला जातो.

मुंबई - संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या दिवशी महाराष्ट्रातील शाळा - महाविद्यालयांतही ‘योग दिन’ साजरा केला जातो. मात्र आता दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असे मत शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा.

टॅग्स :योगसरकार