Join us

वालधुनी नदीवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: December 11, 2014 02:09 IST

वालधुनी नदीत टँकरद्वारे रसायने सोडणा:यांवर वॉच ठेवण्यासाठी पालिका नदीकिनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे.

सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
वालधुनी नदीत टँकरद्वारे रसायने सोडणा:यांवर वॉच ठेवण्यासाठी पालिका नदीकिनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. नदीकिनारी पालिका कर्मचारी पोलिसांसमवेत गस्त घालणार असल्याची माहिती पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी महासभेत दिली. आयुक्तांच्या घोषणोने टँकरमाफियांचे धाबे दणाणले असून जीन्स कारखान्यांचा प्रश्न मात्र जैसे थे आहे.
उल्हासनगरातील वालधुनी नदीत जीन्स कारखान्यांसह केमिकल कारखाने, शहरातील सांडपाणी सोडले जात आहे. तसेच पुणो, गुजरात, पाताळगंगा आदी केमिकल झोनमधून टँकरमाफिया घातक रसायने प्रक्रिया करण्याच्या बहाण्याने आणून नदीपात्रत सोडत आहेत.   
टँकरमाफियांना पोलिसांनी गजाआड केले, तरी खरे गुन्हेगार बाहेर आहेत. बहुतांश टँकरमाफिया उल्हासनगरातील आहेत. ख:या मालकांनी चालक व वाहकांच्या नावावर टँकर केले आहेत. त्यांना दरमहा ठरावीक पगार देऊन ही विघातक कामे करून घेतली जात आहेत़  पोलिसांनी या दिशेने चौकशी केल्यास खरे गुन्हेगार गजाआड  होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  नदी प्रदूषित करणा:या टँकरमाफियांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  
मात्र, तोच न्याय जीन्स कारखान्यांना का नाही, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
 
उंच इमारतींवर लावणार कॅमेरे
वालधुनी नदीकिनारी असलेल्या उंच इमारतींवर टॉवर उभारून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.   त्यासाठी विशेष निधीची तरतूद केल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली आहे. टँकरमाफियांवर वचक बसविण्यासाठी लाखो रुपये खर्च करणार आहे.  मात्र, नागरिकांच्या जीवाशी खेळणा:या व नदी प्रदूषित करणा:या जीन्स कारखान्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.