Join us

पालिका शाळांवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: December 24, 2014 01:05 IST

पाकिस्तानच्या सैनिक शाळेतील तालिबानी हल्ल्यामुळे पालिका शाळांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे़

मुंबई : पाकिस्तानच्या सैनिक शाळेतील तालिबानी हल्ल्यामुळे पालिका शाळांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे़ याची गंभीर दखल घेऊन अखेर शाळांचे प्रवेशद्वार आणि व्हरांड्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्याचा निर्णय शिक्षण समितीने आज घेतला़ पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे़गेल्यावर्षी पालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही लावण्याची मागणी जोर धरली होती़ शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार हे स्वत: याबाबत आग्रही होते़ पाकिस्तानातील घटनेनंतर मुंबईतही धोक्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाची अखेर झोप उडाली आहे़ पालिका शाळांचे प्रवेशद्वार व व्हरांड्यात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार होणार आहे़ यासाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे़ त्यानंतर टप्याटप्याने सर्व शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील़