वैभव गायकर - नवी मुंबई
खारघर ग्रामपंचायतीने मोठा गाजावाजा करून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. काही दिवसांपासून हे कॅमेरे बंद आहेत. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायत स्वत:ची जबाबदारी झटकत आहे.
खारघरची लोकसंख्या वाढत असून सोनसाखळी चोरी, घरफोडी, लूटमार, पाकीटमारी, गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ठराव करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. यासाठी तीन लाख रुपये मंजूर केले होते. शहरातील मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी 13 कॅमेरे बसविण्यासाठी सदर निधी खारघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला होता. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील कार्यरत हाते. त्यांनी एका खासगी कंपनीच्या मार्फत कॅमेरे बसविले होते.
त्यांची बदली झाल्यावर सूर्यकांत जगदाळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यावर मागच्या वर्षी पार पडलेल्या गणोशोत्सवापूर्वी खारघरमध्ये पोलिसांनी सुरक्षाविषयक सभा घेतल्यावर खारघरमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे नागरिकांनी साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिले. सूर्यवंशी यांनी सदर कॅमेरे तत्काळ सुरू करा, असे आदेश जगदाळे यांना दिल्यावर बंद असलेले कॅमेरे पुन्हा सुरू झाले. चार महिन्यांपूर्वी जगदाळे यांची बदली झाल्यावर खारघरमधील कॅमेरे पुन्हा बंद पडले असल्याचे दिसून येत आहे.
खारघरमध्ये जवळपास 4क् शाळा, 15 प्ले ग्रुप, दहा मोठी महाविद्यालये, खासगी रुग्णालय, याशिवाय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे सेंट्रल पार्क,
गोल्फ कोर्स आदी काही महत्त्वाची ठिकाणो, पुरातन मंदिरदेखील आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार शहरातील बहुतांश ज्वेलर्स, बँकांमध्ये
कॅमेरे बसवण्यात आले. मात्न ग्रामपंचायतीने खारघर पोलिसांना दिलेले कॅमेरे बंद असल्यामुळे पोलीस व ग्रामपंचायतीत समन्वय नसल्याचे दिसून येत आहे .
पोलिसांनी मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव करून पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही कॅमेरे सुपुर्द केले. त्या कॅमे:यांच्या देखभालीची जबाबदारी पोलिसांची होती, मात्न त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरामधील कॅमेरे बंद पडले आहेत.
- गुरु नाथ गायकर, तत्कालीन उपसरपंच
तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
कॅमेरे बंद पडले असून काही कॅमे:यांच्या वायर्स तुटल्या आहेत. ग्रामपंचायतीबरोबर चर्चा करून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.
- पंढरी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
खारघर पोलीस ठाणो