Join us

पवई तुंगा परिसरात बसणार सीसीटीव्ही

By admin | Updated: April 17, 2016 01:28 IST

शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांना वाटणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांना बाहेर काढून बळ देण्यासाठी चांदिवलीतील मनसेचे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी पवई

मुंबई : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांना वाटणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांना बाहेर काढून बळ देण्यासाठी चांदिवलीतील मनसेचे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी पवई तुंगा व्हिलेज परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेतला असून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. पवई तुंगा व्हिलेज प्रभाग क्रमांक १५0 मधील एमएमआरडीए वसाहत मिलिंदनगर, शिवशक्ती, राजे शिवाजीनगर, बुध्या जाधव वाडी, प्रेमनगर, मुरंजन वाडी, उदयनगर, नेन्सी मुन्सी चाळ या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. याबाबत अशोक माटेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पवईच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्यासारख्या घटनेमुळे विभागातील नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाल्याने मी या कामी पुढाकार घेतला आहे. घरफोडे, चोऱ्या यासारख्या गुन्हेगारी कारवायांना यामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई महाडेश्वरकर यांनी या उपक्रमाची स्तुती केली आहे.