Join us

कर्जत तहसील कार्यालयात सीसी टीव्ही कॅमेरे

By admin | Updated: June 12, 2014 01:28 IST

कर्जत तालुक्यातील सरकारी अधिकारी मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेले.

नेरळ : कर्जत तालुक्यातील सरकारी अधिकारी मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेले. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात आपलेपणा वाटावा, म्हणून तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी आपल्या केबिनचे दरवाजे उघडे ठेवण्यास सुरु वात केली. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले पहिले तहसील कार्यालय म्हणून कर्जत तहसील कार्यालयाने हा मान पटकावला आहे . यापूर्वी दोन तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यना लाचलुचपत विभागाने पकडले आहे . त्यानंतर आणखी काही अधिकारी पकडले गेले आहेत. शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद केली आहे.