Join us

सचिन वाझेची तळोजा कारागृहात चौकशी करण्यासाठी सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन ...

अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सीबीआयने विशेष एनआयए न्यायालयात गुरुवारी अर्ज केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचार आरोपांची चौकशी करण्याकरिता सीबीआयने सचिन वाझेचा एप्रिलमध्ये जबाब नोंदविला होता. आपल्याला बारमालकांकडून पैसे जमा करण्यास सांगण्यात आले होते, असा जबाब वाझे याने दिला होता. सीबीआय व ईडीने त्याचा हा जबाब नोंदवला होता. ईडीने या प्रकरणी पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवून देशमुख यांचे खासगी सचिव व साहाय्यकाला अटकही केली, तर सीबीआयने अद्याप या प्रकरणात एकालाही अटक केलेली नाही.

या अर्जावर न्यायालय शुक्रवारी निर्णय घेणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सीबीआयने दंडाधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदवणाऱ्या बारमालकाचा व अन्य तिघांचा जबाब नोंदविण्यासाठी अर्ज केला आहे.