Join us  

पोलीस नोकरी नाकारणारा ‘मोतीबिंदू’ मॅटने केला दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 8:23 AM

पोलीस हवालदार पदासाठी अपात्र ठरलेल्या उमेदवाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाचा दिलासा

मुंबई : उमेदवाराला मोतीबिंदू आहे. भविष्यात अंधत्व येऊ शकते, त्यामुळे तो उमेदवार पोलीस हवालदार होण्यास पात्र नाही, असा वैद्यकीय हवाला पोलीस हवालदार पदासाठी अपात्र ठरलेल्या उमेदवाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) दिलासा दिला आहे.प्रदीप यशवंत साठे असे या उमेदवाराचे नाव आहे. पोलीस हवालदार पदासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहिरात दिली. प्रदीपने त्यासाठी अर्ज केला. मैदानी व लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. प्रदीपला दृष्टिदोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला. हा दोष दूर करण्यासाठी त्याने शस्त्रक्रिया केली. दृष्टिदोषाचे निरसन झाले. प्रदीपला मोतीबिंदू आहे, भविष्यात त्याला अंधत्व येऊ शकते, असा अहवाल जे. जे. रुग्णालयाने दिला.त्याचा आधार घेत प्रदीपला पोलीस हवालदारपदासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्याविरोधात त्याने मॅटमध्ये धाव घेतली. मात्र शारीरिकरीत्या अपात्र उमेदवाराला सेवेत घेता येत नाही, असे प्रतिज्ञापत्र सहायक पोलीस आयुक्त यांनी सादर केले. तरीही पुन्हा चाचणी करावी, अशी विनंती प्रदीपच्यावतीने करण्यात आली. त्यानुसार पुणे येथील ससून रुग्णालय व नायर रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यात त्याला मोतीबिंदू नसल्याचे अहवाल दिला.