Join us

जकात नाक्यांवर सागरी मार्गाचे कास्टिंग यार्ड, मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:38 IST

मुंबईत वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जकात नाके ओस पडले आहेत.

मुंबई : मुंबईत वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर जकात नाके ओस पडले आहेत. त्यामुळे या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात येणार होती. मात्र या जागेचा वापर आता मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडच्या कास्टिंग यार्डसाठी करण्यात येणार आहे.मुंबईत पाच जकात नाके आहेत. पालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर या नाक्यांवरून मुंबईत दाखल होणाºया मालवाहू वाहनांकडून वसूल केला जात होता. मात्र जुलै २०१७पासून मुंबई जकात कर रद्द करून जीएसटी अंमलात आला आहे. त्यामुळे हे जकात नाके ओस पडल्याने समाजकंटकांकडून त्यांचा गैरवापर तसेच तेथे अतिक्रमण होण्याची भीती व्यक्त होत होती. या ठिकाणी प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाचे (आरटीओ) कार्यालय किंवा खासगी वाहनांसाठी आगार बांधण्याची मागणी होत होती. मात्र पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या ठिकाणी कोस्टल रोडसाठी कास्टिंग यार्ड बनविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वच जकात नाक्यांवर संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव मागे घेत ही जागा कोस्टल रोडच्या कास्टिंग यार्डसाठी वापरणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीत सांगितले.दोन टप्प्यांत असे होणार कामनरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग. पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी -लिंकपर्यंत ९.९८ किमीचे काम २०१९पर्यंत करण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात वांद्रे सी-लिंक ते कांदिवली असे काम करण्यात येईल.दोन बोगदे : किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. यासाठी ९० हेक्टर भरणी केली जाणार आहे. तर प्रत्येकी ३.४५ किमीचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका