कासा : महामार्गावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.डहाणू तालुक्यातील आंबोली जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सफारी गाडीचा टायर फुटल्याने अपघात घडला. या गाडीचा वेग जास्त असल्याने टायर फुटून ती डिव्हायडर तोडून दुसऱ्या मार्गावरील टेम्पोला धडकली. या अपघातात सफारी गाडीतील अमोल सुतार, प्रफुल परमार, रा. वापी हे दोघे जागीच ठार झाले तर टेम्पो चलाक धर्मेश राजपूत गंभीर जखमी झाला आहे. ही सफारी गाडी गुजरातहून मुंबईकडे जात होती.
कासा : टायर फुटले अपघातात २ ठार
By admin | Updated: December 15, 2014 22:48 IST