मुंबई: सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी सेलचे पथक टॅक्सी चालकांची माहिती गोळा करत असताना शनिवारी ब्रिजेश सिंग (३२) या टॅक्सीचालकाकडे आठ जिवंत काडतुसांसह एक गावठी पिस्तुल सापडले आहे. सिंग याला हत्यारबंद कायद्यांतर्गत अटक झाली आहे. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. सिंग हा कांदिवली येथे राहतो. त्याच्याकडे हे गावठी पिस्तुल कुठून आणले आणि त्याचा अन्य कुठल्या गुन्ह्यांत सहभाग होता का? याबाबत तपास सुरु आहे. दिल्लीत खाजगी टॅक्सीचालकाने एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्व टॅक्सीचालकांची तपासणी करुन त्यांची माहिती गोळा करत आहेत. (प्रतिनिधी)
टॅक्सीचालकाकडे सापडली काडतुसे
By admin | Updated: December 15, 2014 01:02 IST