Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहने बिनधास्त रस्त्यावर

By admin | Updated: July 12, 2014 22:36 IST

कळंबोली, खांदेश्वर, कामोठे राष्ट्रीय महामार्ग व इथल्या वसाहतीमधील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी ट्रक, टँकर पार्क करून ठेवले जात असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कळंबोली : कळंबोली, खांदेश्वर, कामोठे राष्ट्रीय महामार्ग व इथल्या वसाहतीमधील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी ट्रक, टँकर पार्क करून ठेवले जात असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  आता नागरी वसाहतीत जड, अवजड व केमिकलचे टँकर्स उभे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग व कळंबोली सर्कल ते धन्वंतरी रुग्णालय या मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला शेकडो गाडय़ा दिवस-रात्रभर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होत आहेत. तर अपघाताचीही भीती येथील नागरिक वर्तवित आहेत.
कळंबोली शहरात तर सर्रासपणो रसायनाचे टँकर, अवजड ट्रक, वसाहती अंतर्गतच्या रस्त्यांवर पार्क केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणो खांदेश्वर आसूडगाव बसडेपो परिसरात अवजड वाहनांचे बेकायदा वाहनतळच बनले आहे. तर स्टील बाजारातील पेरिफेरी रस्ता एका बाजूने पर्ा्िकगच्या वाहनांनी व्यापला असून येथे बिनधास्तपणो वाहने दुरूस्तही केली जात आहेत. या अवैध पर्ा्िकगला नागरिकांनी विरोध दर्शवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मागील कित्येक वर्षापासून या शहरांमध्ये अवजड वाहने पर्ा्िकगचा प्रश्न येथील रहिवाशी मांडत आहेत. वाहतूक शाखेकडे तक्रारीही करीत आहेत. पण वाहतूक विभाग रहिवाशांच्या या समस्येकडे पाठ फिरवत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. हे ट्रकचालक अनेकदा स्टोव्ह पेटवून गाडीतच जेवण बनवितात त्यामुळे केमिकलच्या टँकरचा भडका होऊन अपघात होण्याची शक्यता स्थानिक रहिवासी वसंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ट्रकचालक रात्रीच्या वेळी दारू पितात आणि रस्त्यावरच पत्त्यांचा डाव मांडतात अशा घटना रोडपाली डी मार्ट समोरील रस्ता येथे सुरू असतात. त्यामुळे येणा:या-जाणा:या पादचा:यांना त्यांचा त्रस होतो. काही वर्षापूर्वी पोलिसांनी वसाहतीमध्ये ट्रक व टँकर पार्क करण्यास मनाई केली होती. परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. बेकायदेशीररित्या होणा:या या अवजड वाहनांच्या पर्ा्िकगला आळा घालावा अशी मागणी सेक्टर-1 ई मधील रहिवासी देखील करीत आहेत. 
कळंबोलीतील मॅकडोनल्ड येथे तर मुख्य रस्त्यावर लक्झरी बस कशाही पार्क करून पॅसेंजर घेतले जातात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. तर कळंबोली सर्कल ते धन्वंतरी हॉस्पिटल र्पयत वाहनांनी  ठिय्याच मांडला आहे. त्यामुळे येथील परिसरात राहणारे वयस्कर नागरिक, स्त्रिया आणि शाळेतील मुलांना त्यांचा त्रस सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
 
सगळीकडे कारवाई करण्यासाठी कर्मचा:यांची कमतरता आहे. वसाहतीमधील एक एक भाग घेऊन कारवाईची योजना करीत आहे. 
- प्रदीप गिरीधर, पोलिस निरीक्षक, वाहतूक कळंबोली