Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या चोरायचा निव्वळ ‘जॉय राईड’साठी!

By admin | Updated: March 11, 2017 01:33 IST

निव्वळ ‘जॉय राईड’साठी महागड्या गाड्या चालविण्याच्या हौसेने एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाला चोर बनविले. डिलिव्हरी बॉय बनत गाड्या चोरायच्या आणि मनसोक्त

मुंबई : निव्वळ ‘जॉय राईड’साठी महागड्या गाड्या चालविण्याच्या हौसेने एका उच्चभ्रू कुटुंबातील तरुणाला चोर बनविले. डिलिव्हरी बॉय बनत गाड्या चोरायच्या आणि मनसोक्त चालवून कंटाळा आला की मध्येच कुठेतरी सोडून पसार व्हायचे, अशी त्याची कार्यपद्धती होती. फैजान अफजल पटेल (२४) असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. जो मूळचा वसईचा राहणारा असून, त्याच्या वडिलांचा गाड्यांच्या स्पेअरपार्ट्सचा व्यवसाय आहे. पटेलला महागड्या गाड्या चालविण्याची हौस होती. त्यासाठी त्याने गाड्या चोरी करण्यास सुरुवात केली. आरे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेलने आरे परिसरातून तीन गाड्या चोरल्या होत्या. ज्यात मोटारसायकल आणि कारचा समावेश आहे. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तीन-तीन महिने काम करायचे आणि खाण्याची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने मोठमोठ्या सोसायटीत जायचे. एखादी गाडी टार्गेट करायची. त्याचे हॅण्डल लॉक झटका मारून तोडायचे आणि ती गाडी लंपास करायची, चोरीची गाडी फिरवून मन भरले की ती कुठेही रस्त्यात किंवा एखाद्या पार्किंगमध्ये सोडून पसार व्हायचे, अशी त्याची कार्यपद्धती होती. त्याला आरे परिसरातूनच पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)