नवी मुंबई : नवीन पनवेलमधील एलिव्हेटेड पुलाखाली सकाळी स्कॉर्पिओ कारला आग लागली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पीओ गाडी पुलाखाली आली असताना गाडीतून धूर येऊ लागला. चालकाने तत्काळ कार थांबवून सर्वांना गाडीबाहेर उतरविले. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या फायर इंजिनच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. परंतु थोड्या वेळाने पुन्हा धूर येऊ लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गाडी तत्काळ रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. (प्रतिनिधी)
नवीन पनवेलमध्ये कारला आग
By admin | Updated: August 13, 2014 01:48 IST