पनवेल : मुंबई- पुणे महामार्गावर तक्का गावच्या हद्दीत एक वॅगनर गाडी कठड्यावर आदळल्याने अपघात झाला. त्यामुळे गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असली तरी कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक वॅगनर कार पुणे बाजूकडून नवीन पनवेलला चालली होती. शिवशंभो हॉटेलजवळ कार आली असता अचानक वाहनचालक प्रभाकर रंजन याचा ताबा सुटला. आणि वॅगनर कठड्यावर चढली. अपघाताची तीव्रता मोठी असूनही चालक जखमी झाला नाही. दैव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे वाहनचालक सुखरूप राहिला. (वार्ताहर)
गाडी कठड्यावर चढली
By admin | Updated: May 29, 2014 00:52 IST