- डिप्पी वांकाणी, मुंबईइंद्राणी मुखर्जी २२ आॅगस्ट रोजी तिच्या पतीने वरळीतील निवासस्थानी आयोजित पार्टीत रंगून गेलेली असताना आदल्याच दिवशी तिचा कारचालक श्याम राय याला अटक झाल्याची तिला कल्पना नव्हती. शीना बोरा हिचे अपहरण करून खून करण्यात सहभागी होण्यासाठी २०१२ मध्ये राय याला एक लाख रुपये देण्यात आल्याचे समजते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी राय कामावर गेला नाही. तिने त्याची चौकशी केली. नंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार रायने इंद्राणीला फोन करून आजारी पडल्यामुळे काही दिवस कामावर येऊ शकणार नसल्याचे सांगितले. इंद्राणीने याकडे फारसे लक्ष न देता आपला दिनक्रम सुरू ठेवला.दरम्यान, पोलिसांनी रायला पेण येथे नेले. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट जेथे त्याने लावली ती जागा त्याने त्यांना दाखविली. रायच्या निवेदनाच्या आधारे इंद्राणीला अटक केली.
कारचालकाला दिले होते एक लाख रुपये
By admin | Updated: August 28, 2015 02:32 IST