मुंबई : भरधाव वेगात आलेली कार झोपडीत घुसून चार महिला जखमी झाल्याची घटना आज चेंबूरच्या सुमननगर येथे घडली. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
सायन-पनवेल मार्गावरील शिवसेना शाखेजवळ ही घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. येथील समर्थनगरातील झोपडपट्टीत राहणा:या काही महिला गणोशोत्सव असल्याने घरात गप्पा मारत बसल्या होत्या. याच दरम्यान लालडोंगरच्या दिशेने (एमएचक्4, बीएच7253) ङोन कार भरधाव वेगात आली. कारमध्ये बसलेला चालक शिकाऊ असल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आाणि गाडी या झोपडय़ांमध्ये घुसली. यामध्ये विमल सगट (5क्), नंदा पवार (35), मंगळ वाघमारे आणि अंजन वाघमारे (19) या चार महिला जखमी झाल्या आहेत. याच झोपडय़ांच्या समोर सार्वजनिक गणपती बसवला आहे. (प्रतिनिधी)