मुंबई: लाखो रुपयांचे एलएसडी डॉट्स हस्तगत करण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने करत, एका विद्यार्थ्यासह दोघांना अटक केले आहे.सॅमसन रोझरियो (३०) आणि रोहन ओवल (२६) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जे मीरारोडच्या कनकियाचे राहणारे आहेत. रोझरियो हा इस्टेट एजंट असून, ओवल विद्यार्थी आहे. दहिसरच्या कांदरपाडा परिसरात काही लोक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिटचे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास या परिसरात सापळा रचला आणि या दोघांना अटक केली. त्यांच्या अंग झडतीत पोलिसांना दोन लाख तीस हजार रुपयांचे एलएसडी डॉट्स हस्तगत केले आहेत. हे अंमली पदार्थ त्यांनी कुठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत, तसेच या दोघांचा एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्याबाबतही चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)
लाखो रुपयांचे एलएसडी डॉट्स हस्तगत
By admin | Updated: May 3, 2017 06:36 IST