Join us  

मध्य रेल्वेवरील ‘राजधानी’च्या फेऱ्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:50 AM

मुंबई-दिल्लीमधील अंतर कापण्यासाठी कमी कालावधी लागावा यासाठी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्याची शक्यता आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई-दिल्लीमधील अंतर कापण्यासाठी कमी कालावधी लागावा यासाठी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्याची शक्यता आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन असा राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास असून पहिल्या दिवसापासून प्रवाशांनी एक्स्प्रेसचे स्वागत केले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी राजधानी एक्स्प्रेसच्या आठवड्यामधील फेºया वाढविण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाला वेग आणि फेºया वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून वेग आणि फेºया वाढविण्याचे काम सुरू आहे. गोयल यांनी १९ जानेवारीला राजधानी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात राजधानी एक्स्प्रेसचा सध्याचा १८ तासांचा अवधी कमी करून फेºया वाढविणार असल्याचे सांगितले होते. यामुळे मुंबई-दिल्ली अंतर कापण्यासाठी तिला कमी कालावधी लागेल.रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वे मार्गावरील राजधानीसाठी एकूण २१ डबे देण्याचा निर्र्णय घेतला आहे. यात ३ टायर एसीचे १० डबे, २ टायर एसीचे ६ डबे, ३ जनरेटर आणि २ पँट्री डबे असतील. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून हे डबे मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. सध्या १६ डब्यांची राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहे. या एक्स्प्रेसला जादा डबे जोडून जादा फेºया उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली. राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन प्रवास करतेवेळी कमाल वेगमर्यादा ११० ते १३० प्रति तास असून सरासरी राजधानी एक्स्प्रेसचा वेग ७९ किमी आहे. एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :राजधानी एक्स्प्रेसकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण