Join us

उमेदवारांना ‘जायंट किलर’ होण्याचे वेध

By admin | Updated: April 22, 2015 05:59 IST

पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीला सामोरे जावे लागल्याने अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात दिसत आहेत.

पंकज पाटील, अंबरनाथ पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीला सामोरे जावे लागल्याने अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात दिसत आहेत. काही दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना पाडण्यासाठी काही उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांना ‘जायंट किलर’ होण्याचे वेध लागले आहेत. सर्वच पक्ष पालिका निवडणूक स्वबळावर लढत असल्याने प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सर्वच पक्षांत काही दिग्गज उमेदवार रिंगणात असून प्रतिस्पर्धी पक्षांनी या दिग्गजांना पाडण्यासाठी मोहरे रचले आहेत. दोन ते तीन वेळा नगरसेवक झालेल्यांना पाडून जायंट किलर होण्यासाठी अनेक इच्छूक आहेत. त्यासाठी छुपी तयारीदेखील त्यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन वेळा नगरसेवक राहिलेले आणि प्रभागात वर्चस्व असलेल्या नगरसेविकेचा पती वसंत पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार दिनेश गायकवाड यांच्याकडून धक्का बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)