Join us
Daily Top 2Weekly Top 5

नायर रुग्णालयात पोलिसांसाठी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयात नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले. या ...

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल. नायर धर्मादाय रुग्णालयात नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिरात शंभरहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

रुग्णालयाच्या महोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून नायर रुग्णालयाच्या वतीने वरळी पोलीस ठाण्यात शिबिर घेण्यात आले. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाने खुशिया सेवा संस्था या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने वरळी पोलीस ठाणे येथे विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले.

यावेळी १००हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी ह्यांची दृष्टिदोष, मोतिबिंदू आणि मधुमेह रेटिनोपॅथी इत्यादी नेत्रविषयक विविध आजारांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. तसेच, रुग्णालयाच्या शताब्दी उत्सवाचा एक भाग म्हणून अंधत्व प्रतिबंधक जागरूकतादेखील यानिमित्ताने करण्यात आली.