Join us

बिबट्यांवर आता कॅमे-याची नजर

By admin | Updated: August 25, 2014 02:09 IST

गेल्या महिन्यात आयआयटी मुंबईमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला. आयआयटी बॉम्बेचा कॅम्पस पाचशे एकरमध्ये विस्तारलेला असताना बिबट्याला पकडणे कठीण गेले होते

मुंबई : गेल्या महिन्यात आयआयटी मुंबईमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच गोंधळ उडाला. आयआयटी बॉम्बेचा कॅम्पस पाचशे एकरमध्ये विस्तारलेला असताना बिबट्याला पकडणे कठीण गेले होते. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून आता बिबट्यांच्या हालचालींवर कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. वन्यजीवशास्त्रज्ञांच्या मदतीने येत्या काही दिवसांत हा उपक्रम राबविण्यात येईल.वन्यजीवशास्त्रज्ञ कादंबरी देवराजन ही इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये बिबट्यांच्या हालचालींचे दस्तऐवजीकरण करणार आहे. आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा दलाने देवराजन यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार संशोधनाद्वारे कॅम्पसमधील बिबट्याच्या हालचाली टिपण्याचे प्रशिक्षण कादंबरी आयआयटीच्या सुरक्षा दलातील सदस्यांना देणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या संदर्भातील प्रकल्पामध्ये दीप्ती यांनी काम केले होते. आयआयटीच्या परिसरात हिरवळ असल्याने बिबट्यांचा वावर असतो. त्यामुळे तेथे सुरक्षेच्या दृष्टीने ८ ते १० कॅमेरे बसविले आहेत. (प्रतिनिधी)