नवी मुंबई : दिघा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. हा ठक दुसरा तिसरा कोणी नसून घरमालकाचाच नातेवाईक असल्याचे यातून उघड झाले आहे. त्यामुळे पाहुणा म्हणून आला आणि घरफोडी करून गेला अशीच काहीशी चर्चा सध्या दिघ्यातील नागरिकांमध्ये होत आहे.महलेश गौडा (२९) असे या चोराचे नाव आहे. दिघा येथील बिंदुमाधव नगरमध्ये तो बलराम गौडा या नातेवाईकांकडे राहायचा. १९ जानेवारी रोजी त्याने बलराम यांचे घर बंद असताना कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला व घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असा २ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी एकजण होता. मात्र या घरफोडीनंतर महलेश मूळगावी कर्नाटकला पळून गेला.त्यामुळे तो पोलीसांच्या हाती लागत नव्हता.दरम्यान महलेश मुंबईत आल्याची माहिती खब-यांकडून मिळाल्यानंतरअखेर शुक्रवारी त्याला बेड्या ठोकल्या असल्याचे रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले. या घरफोडीत महलेशला मदत करणा-या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाहुणा म्हणून आला अन् घरफोडी करून गेला
By admin | Updated: November 17, 2014 00:45 IST