Join us

कामा रुग्णालय सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:57 IST

महिला व बालकल्याण विभागांतर्गत आमदारांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीद्वारे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मुंबईतील सरकारी-पालिका रुग्णालयांचे सर्वेक्षण केले.

मुंबई : महिला व बालकल्याण विभागांतर्गत आमदारांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीद्वारे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मुंबईतील सरकारी-पालिका रुग्णालयांचे सर्वेक्षण केले. यात पालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये तसेच सर जे.जे. समूह रुग्णालयांचा समावेश होता. कुठलीही प्रकारची पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात कामा रुग्णालय सर्वोत्कृष्ट ठरले आहे. या रुग्णालयात महिलांसाठी उत्तम सेवा आणि स्वच्छता राखण्यात आली आहे.सर्वेक्षणासाठी मुंबईतील ३५ आमदारांची एक समिती गठीत केली होती. या समितीद्वारे मुंबईतील सरकारी व पालिका रुग्णालयांचा सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात रुग्णालयाचा स्वच्छ परिसर, रुग्णांची नियमित देखभाल, स्वच्छ वॉर्ड आणि स्वंयपाकगृहात असलेली शिस्त याची पाहणी करून कामा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा प्रथम पुरस्कार देण्यात आला.कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले की, राज्य सरकारनेकामा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट प्रमाणपत्र दिले आहे. रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र प्रसूतीगृह, सोनोग्राफी केंद्र, बाह्यरुग्ण विभाग तसेच कॅन्सर महिलांवर उपचार करण्यासाठी पॅपस्मिअर व मँमोग्राफी चाचण्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय रुग्णालयाच्या आवारात रोपटीदेखील लावण्यात आली आहेत.>महिला व बालकल्याण विभागांतर्गत आमदारांच्या स्वतंत्र समितीद्वारे मुंबईतील सरकारी-पालिका रुग्णालयांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात रुग्णालयाचा स्वच्छ परिसर, रुग्णांची देखभाल, स्वच्छ वॉर्ड आणि स्वंयपाकगृहात असलेली शिस्त याची पाहणी करून कामा रुग्णालयाला सर्वोत्कृष्ट करार देण्यात आला. राज्यसरकारतर्फे सर्वाेत्कृष्टतेचे प्रमाणपत्रही देण्यात आले.