Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका कॉलवर महापालिका डेब्रिज उचलणार

By admin | Updated: August 2, 2015 03:19 IST

मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या बांधकामांचे डेब्रिज अनधिकृतपणे रस्त्यांवर टाकले जाते. परिणामी रस्त्यांवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजचा मुंबईकरांना त्रास होतो. मात्र आता अशा डेब्रिजचा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या बांधकामांचे डेब्रिज अनधिकृतपणे रस्त्यांवर टाकले जाते. परिणामी रस्त्यांवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजचा मुंबईकरांना त्रास होतो. मात्र आता अशा डेब्रिजचा नागरिकांना त्रास होऊ नये आणि हे डेब्रिज उचलण्यात यावे म्हणून महापालिकेने ‘डेब्रिज आॅन कॉल’ ही सेवा सुरु केली आहे.या सेवेसाठी नागरिकांना विभागनिहाय संपर्क करण्याकरिता घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘स्वच्छ भारत अभियान नियंत्रण कक्षा’च्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय यासंबधीची माहिती    http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.‘स्वच्छ भारत अभियान नियंत्रण कक्षा’चे दूरध्वनी२४९४४३७२२४९५५३३९२४९५४७९९