Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अतिरेकी असल्याचा अमेरिकेतून कॉल; अधिक तपास सुरू

By मनीषा म्हात्रे | Updated: August 22, 2023 15:12 IST

पुणे पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : वरळीमधील एपीक कॅपिटलमध्ये एक अतिरेकी  असल्याची माहिती देणारा कॉल अमेरिकेतून पुणे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला आहे. पुणे पोलिसांनी याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोमवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी पुणे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात अमेरिकेतून अर्थ पांचाळ नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने एका व्यक्तीचे नाव घेत तो अतिरेकी असून एपीक कॅपिटल, मुंबई येथे असल्याचे  सांगून कॉल कट केला. पुणे पोलिसांनी लगेचच ही माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली.

मुंबई पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या अमेरिकेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही माहिती दिली नाही. तसेच, लगेच कॉल कट केला. एपिक कॅपिटलचे ऑफिस वरळी येथे असल्याने मुख्य नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिसांना याचा अलर्ट दिला आहे.