Join us  

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत होण्यासाठी सहकार्य करा, शहर जिल्हाधिकारी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:08 AM

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शकपणे पार पडावी याकरिता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.

मुंबई - मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शकपणे पार पडावी याकरिता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले. मुंबई शहर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांसाठी २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात मतमोजणी प्रतिनिधींबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.मुंबई शहर जिल्ह्यात मुंबई दक्षिण मध्य व मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून २३ मे रोजी शिवडी येथे मतमोजणी होणार आहे. कायद्यानुसार मतमोजणीचे काम उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत, त्या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने किंवा त्यांच्या देखरेखीखाली व निर्देशानुसार करावयाचे असते. तेव्हा मतमोजणीकरिता उपस्थित राहणाºया उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक, ओळखपत्र, मतमोजणी केंद्रावर काय करावे किंवा करू नये? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले.अशी सुरू आहे २३ मेची तयारीमतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात, कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.प्रत्येक प्रतिनिधीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ओळखपत्र तयार करतील व ते उमेदवारास देण्यात येईल.मतमोजणी केंद्रात प्रतिनिधींना सोबत भ्रमणध्वनी बाळगता येणार नाही.पिण्याचे पाणी, अल्पोपाहार, प्रसाधनगृह इत्यादींची मतमोजणी कक्षाच्या लगतच तरतूद करण्यात येईल.मतमोजणी प्रतिनिधींकरिता निदेश पुस्तिकेचे वाटप उपस्थित उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी यांना करण्यात आले आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019