Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅब, रिक्षाचालकांना चारित्र्य दाखला सक्तीचा

By admin | Updated: December 13, 2014 22:28 IST

दिल्लीत टॅक्सी चालकाकडून झालेला बलात्कार आणि ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणानंतर आता ठाणो पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत.

ठाणो - दिल्लीत टॅक्सी चालकाकडून झालेला बलात्कार आणि ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणानंतर आता ठाणो पोलिसांनी  महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार टॅब, कॅब, खाजगी टॅक्सी, कॉल सेंटरच्या गाडय़ा, रिक्षा आदींवर काम करणा:या चालकांची संपूर्ण माहिती त्यांच्या मालकांनी आपल्या जवळ ठेवावी. तसेच त्याचा चारित्र्याचा दाखला आपल्याकडे ठेवावा, जेणो करुन त्या चालकावर कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अथवा नाही याची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यातही पुढे जाऊन असा प्रकार घडला आणि मालकाकडे चालकाची माहिती नसेल तर चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करण्याचे संकेत ठाणो पोलिसांनी दिले आहेत.
दिल्लीत एका टॅक्सी चालकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर काही महिन्यांपूर्वी ठाण्यातही चालत्या रिक्षातून उडी मारून स्वप्नाली लाड या मुलीने आपले प्राण वाचविले होते. परंतु, अद्यापही पोलिसांनी तो रिक्षाचालक कोण याचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळेच शहरात फिरणा:या टॅब, कॅब, खाजगी बस, रिक्षा, कॉल सेंटरच्या गाडय़ांमधून प्रवास करणा:या महिला आणि तरुणींची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. त्यामुळे त्यांना या वाहनांतून सुरक्षित प्रवास करता यावा, या उद्देशाने ठाणो पोलिसांनी वागळे इस्टेट येथे नुकतीच एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला टॅब, कॅब चे मालक, कॉल सेंटरचे व्यवस्थापक, विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, आरटीओ, वाहतूक पोलीस आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती पोलिसांनी विविध सूचना केल्या आहेत. 
ठाणो शहरात तीन शिफ्टमध्ये रिक्षा चालतात, या रिक्षांवर तीनही शिफ्टमध्ये वेगवेगळे चालक असतात़ परंतु, आपली रिक्षा चालविणारा चालक कोण आहे, याची देखील काही वेळेस माहिती मालकालादेखील नसते. त्यामुळे त्याने या चालकांची संपूर्ण माहिती गोळा करुन तो कुठे राहतो, काय करतो, त्याचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, त्याच्यावर कोणत्या स्वरुपाचे गुन्हे पोलिसात दाखल आहेत का? याचा संपूर्ण तपशिल मालकांनी आपल्याकडे ठेवावा़ तसेच स्थानिक पोलीस ठाण्यालादेखील त्याची माहिती फोटोसह उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
दुसरीकडे कॉल सेंटरमध्ये काम करणा:या महिला अथवा तरुणींच्या सुरक्षिततेसाठी कॉल सेंटरच्या गाडय़ांमध्ये किमान कंपनीचा एक सुरक्षारक्षक असावा अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच शहरात कुठेही, कधीही कशाही पध्दतीने उभ्या राहणा:या टॅब, कॅब, मेरूवरही आता ठाणो पोलीस नजर ठेवणार असून त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम आता केले जाणार आहे. याशिवाय, शहरातील रिक्षा, कॉल सेंटरच्या गाडय़ा, खाजगी टॅक्सी आदींचा डाटा गोळा करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. तसेच या गाडय़ा कुठून कुठे फिरतात याचीही माहिती गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
 
प्रत्येक रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षाच्या मागील सीटवर वाहतूक पोलिसांनी देऊ केलेल्या बारकोड क्रमांकाचे स्टीकर लावून घ्यावे अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरात किती अधिकृत आणि किती अनधिकृत रिक्षा आहेत, त्याची माहिती उपलब्ध करुन देऊन अनधिकृत रिक्षांवर कारवाई करावी, अशा सूचना ठाणो आरटीओला दिल्या आहेत.