Join us

व्यापा-याला गंडवणारी महिला गजाआड

By admin | Updated: November 4, 2014 01:05 IST

आयकर अधिकारी असल्याची धमकी देत व्यापा-याला गंडा घालण्यासाठी आलेल्या महिलेस एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली

मुंबई : आयकर अधिकारी असल्याची धमकी देत व्यापा-याला गंडा घालण्यासाठी आलेल्या महिलेस एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली. यामध्ये एक मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.अशोक पटेल, असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याचा आदर्श सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. काही दिवसापुर्वी एका इसमाचा त्यांना फोन आला. इसमाने आपण आयकर आयुक्त अशिष श्रीवास्तव बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या फ्लॅट संदर्भात बोलायचे असून यामध्ये काही त्रुटी असल्याचे त्याने सांगितले. तसेच या त्रुटी भरून काढण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. मात्र फ्लॅट संदर्भात आपण सर्व कायदेशीर बाबी पुर्ण केल्याचे त्याने सांगितले. यावर पटेल यांना संशय आल्याने त्यांनी या अधिकाऱ्याला काही रक्कम घेण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार आरोपीने नयना देवानी(५०) या महिलेस याठिकाणी पाठवले. पटेल यांनी याबाबत अगोदरच एमएआरए मार्ग पोलिसांना महिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून देवानी हिला अटक केली.