Join us

कर्जाला कंटाळून व्यापा:याची आत्महत्या

By admin | Updated: September 30, 2014 01:00 IST

कजर्दारांच्या त्रसाला कंटाळून एका व्यापा:याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली.

मुंबई :  कजर्दारांच्या त्रसाला कंटाळून एका व्यापा:याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी पाच जणांविरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुनाथ लक्ष्मण गवळी (43), संगीता गुरुनाथ गवळी (4क्), रोहन उर्फ रोहित रामू गवळी (24), वैभव रामू गवळी (19) यांना अटक केली आहे. यामधील मुख्य सूत्रधार सचिन गवळी 
याचा शोध मुलुंड पोलीस घेत 
आहेत. 
उमेश नागेश भांबळे (3क्) असे व्यापा:याचे नाव असून, मुलुंडच्या विठ्ठलनगर येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत तो राहण्यास होता. भांबळेंचा मुलुंड आरआरटी रोड येथे कटलेरीचा व्यवसाय आहे. रविवारी सायंकाळी भांबळेंनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीने दुस:या चावीने घराचा दरवाजा उघडला असता भांबळे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. भांबळेंना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित 
केले.  
भांबळे हे भिशी चालवित होते. चार ते पाच जणांमध्ये ही भिशी चालत होती. त्यात वेगवेगळे गट केले होते. मात्र त्यामध्ये काहींना पैसे मिळत होते तर काहींचे मध्येच रखडत होते. अशात दारूच्या नशेत पैसे गेल्यामुळे कजर्दारांना द्यावयाचे पैसे उरले नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून कजर्दारांनी त्यांच्या घराकडे मोर्चा वळवून पैशांची मागणी केली होती.
रविवारी दुपारी धंद्यावर असताना गवळी कुटुंबीयांनी पैशांची मागणी करीत भांबळे आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली. या प्रकरणी भांबळेंनी मुलुंड पोलीस ठाणो गाठून तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पोलीस पाठविले. घरी पोलीस पाठविल्याचा राग मनात धरीत गुरुनाथ आणि संगीता हिने सायंकाळी विजयनगर येथील भांबळेंच्या वडिलांच्या घरी याचा जाब विचारून भांडण केले. अखेर त्यांच्या जाण्यानंतर धंद्यावर जातो असे सांगून भांबळेंनी घराकडे धाव घेत आत्महत्या केली. यापूर्वीही नैराश्यातून दोन वेळा भांबळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. 
आरोपींपैकी गुरुनाथकडून भांबळेंना 18 लाख, संगीताकडून 1 लाख आणि सचिनकडून 1क् लाख देणो बाकी होते. कजर्दारांच्या त्रसाला कंटाळून भांबळेंनी आत्महत्या 
केली असल्याचे समोर येत 
आहे. (प्रतिनिधी)
 
च्विक्रोळी, टागोरनगर 3मध्ये राहणा:या येल्लपा मल्लपा (4क्) याने आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून रविवारी आत्महत्या केली. तर टागोरनगर 2मध्ये राहण्यास असलेल्या नसरीन नकाब 32 या विवाहितेने जेवणावरून झालेल्या किरकोळ वादातून दुपारी 2च्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. नसरीन ही गृहिणी असून, तिचे पती एका जाहिरात कंपनीत कामाला आहेत. 
च्रविवारी जेवण व्यवस्थित बनविले नाही म्हणून तिच्या सास:यांनी नसरीनच्या कुटुंबीयांना कळविले. हाच राग मनात धरीत तिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले. यापूर्वीही तिने क्षुल्लक कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नसरीनचा मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.