सदानंद नाईक, उल्हासनगरखाजगी ठेकेदारा मार्फत सुरू केलेली पालिका परिवहन सेवा बंद पडल्यानंतर कडोंपाच्या मदतीने शहर अंतर्गत बस सेवा सुरू होणार आहे. ठेकेदाराच्या परिवहन कर्मचा-यांनी बसेस तुमच्या कर्मचारी आमचे असा प्रवित्रा घेतल्याने बस सेवा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेने मोठया धुमधडाक्यात खाजगी ठेकेदारा मार्फत पाच वर्षापूर्वी पालिका परिवहन सेवा सुरू केली होती. ठेकेदाराने काही महिन्यातच डिझेलसह बसच्या सुट्या भागांच्या दरात वाढ झाल्याचे कारण पुढे केले होते. तसेच परिवहन सेवा परवडत नसल्याचे सांगून तिकिट दरवाढ मागितली होती. पालिकेने तिकिट दरवाढीस वांरवांर टाळाटाळ केल्याने बस सेवा ठेकेदाराने बंद केलीे.परिवहन बस सेवा बंद पडल्यानंतर पालिकेने पुन्हा खाजगी ठेकेदारा मार्फत परिवहन सुरू करण्यासाठी तीन वेळा निविदा काढल्या. मात्र कोणीही निविदा भरल्या नाहित. अखेर नागरिकांच्या सोयी साठी आमदार ज्योती कलानी यांनी कल्याण-डोंबविली पालिका परिवहन सेवेच्या मदतीने शहर अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचा पर्यंत्न केला आहे. सोमवार पासुन कडोंपाच्या मदतीने अंतर्गत बस सेवा सुरू होणार असून परिवहन सेवा सुरू करण्याला पालिका परिवहन कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. महापालिकेने भविष्यात परिवहन सेवा सुरू केल्यास परिवहनच्या कर्मचा-याना सामावून घेण्याचा ठराव पालिका महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार कडोंपाच्या मदतीने परिवहन सेवा सुरू झाल्यास पालिका परिवहन कर्मचा-यांना कामावर घेण्याची मागणी संघटनेचे नेते अरूण आशान यांनी केली आहे. शहरा अंतर्गत परिवहन बस सेवा सुरू करण्याला संघटनेचा विरोध नसुन बस तुमच्या, कर्मचारी आमचे अशी ची मागणी संघटनेने केली आहे.
बसेस तुमच्या, कर्मचारी आमचे
By admin | Updated: June 22, 2015 02:01 IST