Join us  

‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला बस प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:51 AM

सायन येथील राणी लक्ष्मी चौकदरम्यानच्या परिसरामध्ये पाच बस थांबे आहेत.

मुंबई : सायन येथील राणी लक्ष्मी चौकदरम्यानच्या परिसरामध्ये पाच बस थांबे आहेत. त्यातील काही बस थांबे रिकामे असतात. त्यामुळे येथील काही बस थांबे एकत्रित करावेत. नेरूळ बस थांब्यावर प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा बेस्ट चालक बसगाड्या थांबवत नाहीत. काही वेळा बेस्ट चालक बसगाड्या रिकाम्याच घेऊन जातात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रवाशांनी ‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ (बेस्टकडून होणारे वाहतुकीचे उल्लंघन) या मोहिमेंतर्गत कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाकडे पाठविल्या आहेत.कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया आणि बेस्ट प्रशासनाच्या सहयोगाने ‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ (बेस्टकडून होणारे वाहतुकीचे उल्लंघन) ही मोहीम राबविली जात आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत मुंबईच्या विविध भागांतून तक्रारी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया यांच्याकडे पाठविल्या आहेत. पुढे या तक्रारी बेस्ट प्रशासनाला पाठवून त्या सोडविण्या जाणार आहेत. दरम्यान, जोगेश्वरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते जयकोच परिसरापर्यंत बसच्या फेऱ्या कमी आहेत. गोरेगाव पूर्वेकडील बस क्रमांक ३२, ३३ आणि २६१ या गाड्या वेळेनुसार धावत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते, अशाही तक्रारी पश्चिम उपनगरामधून प्रवाशांनी केल्या आहेत.कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले की, प्रवाशांनी चुकीची माहिती देऊ नये. प्रवाशांनी खरी माहिती द्यावी.