ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई सेंट्रल येथील बस डेपोत एका बस ड्रायव्हरने दोन वरिष्ठ सहका-यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर त्या ड्रायव्हरने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. शंकर माने असे हल्लेखोर ड्रायव्हरचे नाव आहे.
आज सकाळी दहाच्या सुमारास माने याचा चालकांची ड्युटी लावण्याचे काम असणा-या डोंगरे व शेडगे या दोन वरिष्ठांशी वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या माने याने त्या दोघांवर कोयत्याने वार केला आणि विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. इतर कर्मचा-यांनी या तिघांना उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल केले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.