नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी येथील इलेक्ट्रीकल अँड हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री हे दुकान बंद असताना कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी आत प्रवेश मिळवला. त्यानुसार दुकानातील विविध प्रकारचा सुमारे २९ हजार रुपये किमतीचा माल चोरुन नेला. याप्रकरणी दुकानाचे मालक किशोर चौधरी यांनी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)
एमआयडीसीमध्येदुकानात घरफोडी
By admin | Updated: June 12, 2014 02:33 IST